सर्व बाजूंनी तटबंदी असलेला एकच वाडा येथे होता. पूर्वीच्या काळी ठग -पेंढारी ,लुटारू यांच्यापासून संरक्षणासाठी ही तटबंदी होती . वाडा बराच मोठा असून चारही कोपऱ्यांवर बुरूज होते.आता वाड्याचे थोडे भग्न अवशेष शिल्लक आहेत.गावात प्रत्येकाची पक्की घरे झालेली आहेत .
मांची गावापासून काही अंतरावर पश्चिम-उत्तर दिशेस ,संगमनेर हून येणाऱ्या रस्त्याजवळ भिल्ल समाजाची काही घरे आहेत.
गावाच्या उत्तरेस कानिफनाथांच्या डोंगराजवळ अश्विन आयुर्वेदिक महाविद्यालय(B.A.M.S. College ) व ज्ञानगंगा विद्यानिकेतनचा रमणीय परिसर आहे.संगमनेर कारखान्याचे माजी M.D.म्हणून उत्कृष्ट कार्य केलेल्या श्री.शाळीग्राम होडगर यांनी स्थापन केलेल्या या शैक्षणिक संस्था आहेत.
मांचीच्या पूर्वेस निमगाव जाळी येथे जाण्यासाठी कच्चा गाडी रस्ता आहे. तसेच मांची फाट्यावरून ही पक्क्या डांबरी रस्त्याने (कोल्हार-घोटी मार्ग ) निमगाव जाळीला(अंतर २ किमी ) जाता येते.

0 comments:
Post a Comment