मंदिरे

मांची गावात एकूण ५ प्रमुख मंदिरे आहेत.
१)हनुमान मंदिर 
२)महादेव मंदिर
 ३)सप्तशृंगी देवी मंदिर
 ४)रेणुका देवी मंदिर
 ५)बिरोबा मंदिर 

Temples in Manchi:

In Manchi, there are 5 main temples.
1)Lord Hanuman
2)Lord Shiva
3)Goddess Saptshrungi
4)Goddess Renuka
5)Lord Biroba

गावाचा परिसर

सर्व बाजूंनी तटबंदी  असलेला एकच  वाडा  येथे होता. पूर्वीच्या  काळी  ठग -पेंढारी ,लुटारू  यांच्यापासून संरक्षणासाठी  ही  तटबंदी होती . वाडा  बराच  मोठा  असून  चारही  कोपऱ्यांवर  बुरूज  होते.आता  वाड्याचे  थोडे  भग्न  अवशेष  शिल्लक  आहेत.गावात  प्रत्येकाची पक्की  घरे  झालेली  आहेत .
 मांची  गावापासून काही अंतरावर पश्चिम-उत्तर दिशेस ,संगमनेर हून येणाऱ्या रस्त्याजवळ भिल्ल समाजाची काही घरे आहेत.
गावाच्या उत्तरेस कानिफनाथांच्या डोंगराजवळ अश्विन आयुर्वेदिक  महाविद्यालय(B.A.M.S. College ) व ज्ञानगंगा विद्यानिकेतनचा  रमणीय परिसर आहे.संगमनेर कारखान्याचे माजी M.D.म्हणून उत्कृष्ट कार्य केलेल्या श्री.शाळीग्राम  होडगर यांनी स्थापन केलेल्या या शैक्षणिक संस्था आहेत. 
 मांचीच्या पूर्वेस निमगाव जाळी  येथे जाण्यासाठी कच्चा गाडी  रस्ता आहे. तसेच मांची फाट्यावरून ही पक्क्या डांबरी रस्त्याने (कोल्हार-घोटी मार्ग ) निमगाव जाळीला(अंतर २ किमी ) जाता येते.

इतिहास

पेशव्यांचे सेनापती असलेले निमगावजाळी चे त्रिंबकजी डेंगळे यांच्या वडिलांबरोबर मांची गावातील लोकांचे पूर्वज श्री.बाबाजी येथे आले असे मानले जाते.त्यांना या परिसरातील जमीन  इनाम म्हणून डेंगळ्याकडून  मिळाली होती.येथे धनगर लोकांची मालकी असलेला वाडा होता तो त्यांनी विकत घेतला.त्यांना दोन मुले होती-मानजी व कानजी.याच मानजी च्या नावावरून गावाचे नाव मांची (मानजीचा अपभ्रंश) व शेजारील गावाचे नाव कोंची(कानजीचा अपभ्रंश )पडले असे मानले जाते.गावात पिढ्यानपिढ्या पासून दर दहापंधरा वर्षानी येणाऱ्या राजस्थानी भाटांच्या चोपडीतून ही माहिती उपलब्ध आहे.

 
Copyright © 2010 Manchi(मांची ) | Design : Noyod.Com